*कोंकण एक्सप्रेस*
*अंडरवॉटर म्युझियम अँड आर्टिफिशिअल रीफ आणि पाणबुडीचा गुलदार प्रकल्प कुणकेश्वर समुद्रात व्हावा!*
*कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामपंचायतीची मागणी*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
नौदलाची निवृत्त युद्ध नौका आयएनएस गुलदार समुद्रात स्थापित करुन पाणबुडी प्रकल्प कुणकेश्वर समुद्रात
राबविण्यात यावा, अशी मागणी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांनी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
नौदलाची निवृत्त युद्ध नौका आयएनएस गुलदार समुद्रात स्थापित करुन पाणबुडी प्रकल्प राबविण्याची संकल्पना अनेक वर्षाची होती. हा प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प असुन पर्यटनास महत्वाचा ठरणार आहे. या अंडरवॉटर म्युझियम अँड आर्टिफिशिअल रीफ आणि पाणबुडीचा गुलदार प्रकल्प कुणकेश्वर समुद्रात होण्यासाठी येथील समुद्र खोली व भौगोलिक परिस्थितीचा विचार करता अनुकूल असल्याचे समजते.
तसेच या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या चालना मिळावी म्हणून कुणकेश्वर-देवगड या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी अजुन चालना मिळण्यासाठी उपरोक्त प्रकल्प या ठिकाणी झाल्यास उपयुक्त ठरेल. तरी आपण याकडे विशेष लक्ष देवून हा पर्यटन प्रकल्प मौजे कुणकेश्वर समुद्रात व्हावा, या करिता प्रयत्न करावे. अशी कळकळीची विनंती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने केली आहे.