*कोंकण एक्सप्रेस*
*माता भगिनींसह जनतेला अपेक्षित विकासकार्य करण्यासाठी सदैव तत्पर – आम. निलेश राणे*
*मालवणात महिला मेळावा संपन्न*
*मालवण ः प्रतिनिधी*
महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघात अधिकाधिक विकासनिधी आणून मागील दहा वर्षातील बॅकलॉग भरून काढायचा आहे. गतिमान विकासातून कुडाळ मालवण मतदारसंघ राज्यात टॉप फाईव्ह मतदार संघात आणण्यासाठी प्रयत्नशील असून माता भगिनींसह सर्व जनतेला अपेक्षित असे कार्य करण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण कोळंब येथे बोलताना केले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती मालवण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय मालवण यांचे संयुक्त विद्यमाने मालवण कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उद्योजक तथा शिवसेना उपनेते संजय आंग्रे, उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, गटशिक्षणाधिकारी संजय माने, आरोग्य अधिकारी सुधीर धनगे, सरपंच सिया धुरी, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, अधिकारी भीमसेन पळसंबंकर, प्रभाकर जाधव, व्हिके जाधव, सुनील चव्हाण, उमेद अभियान व्यवसस्थापक रविकिरण कांबळी, प्रभाग समन्वयक प्रिया धरणे, निशिगंधा तांबे, वर्षा मोंडकर, अदिती धुरी यांसह अधिकारी, कर्मचारी, महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी गटाविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांचे
प्रतिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
यावेळी डॉ. कृपा गावडे (आरोग्य), ॲड. प्राजक्ता गांवकर (कायदे), नंदिता सावंत (उद्योग विषयक) यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. ग्रामसेवक युगल प्रभूगांवकर यांनाही उत्कृष्ट कामगिरी बाबत आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी पंचायत समिती नवी इमारत उभारणी लवकरात लवकर केली जाईल. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध केला जाईल. यापुढे विकासासाठी निधी कमी पडणार नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे योगदान, सेवाकार्य मोठे आहे. त्यांनाही अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. महिला बचतगट प्रतिनिधी, मतदार संघातील माता भगिनी या सर्वाना अपेक्षित असे कार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे यांनी पहिल्या तीन महिन्यातच कोट्यावधी विकास निधी मतदारसंघात आणला. त्यासोबत अभ्यासपूर्ण मांडणी व वक्तव्याने अधिवेशनात आपली मोहर उमटवली. प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावे असे काम आमदार निलेश राणे करत आहेत, असे सामंत म्हणाले.

