*डॉ.उदय निरगुडकर आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे शनिवारी तळेरे येथे व्याख्यान*

*डॉ.उदय निरगुडकर आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे शनिवारी तळेरे येथे व्याख्यान*

*कोंकण एक्सप्रेस*

*डॉ.उदय निरगुडकर आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे शनिवारी तळेरे येथे व्याख्यान*

*शिरगांव | संतोष साळसकर*

केंद्र पुरस्कृत पीएम श्री योजनेअंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ या शाळेच्यावतीने शनिवार दि. २९ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. ज्येष्ठ संपादक डॉ.उदय निरगुडकर आणि डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

पीएम श्री योजनेंतर्गत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ च्या वतीने विद्यार्थ्यांमधील समाजभान जागृत व्हावे यासाठी दोन विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ.उदय निरगुडकर हे ‘राष्ट्राचे नागरिक घडताना व घडविताना’ या विषयावर तर डॉ. मिलिंद कुलकर्णी हे ‘छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या दोन्हीही व्याख्यांनांना तळेरे गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव व शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!