*कोंकण एक्सप्रेस*
*मिठमुंबरी शाळेतील विद्यार्थ्यांचे डाॅ.ऐ पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश*
*शिरगाव | संतोष साळसकर*
९ मार्च रोजी शेठ म ग हायस्कूल, देवगड येथे घेण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा मिठमुंबरी क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे.
या परीक्षेत वैभवी गावकर याने १९४ गुण, तर सान्वी गावकर आणि तन्मय गावकर यांनी प्रत्येकी १९२ गुण मिळवून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.या विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक श्री. सचिन धुरी यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री. मधुसूदन घोडे, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

