*..तर खासगी बसेसची नियमबाह्य वाहतूक मनसे रोखणार !*

*..तर खासगी बसेसची नियमबाह्य वाहतूक मनसे रोखणार !*

*कोंकण एक्सप्रेस*

*..तर खासगी बसेसची नियमबाह्य वाहतूक मनसे रोखणार !*

*उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा…*

बुकिंग एजंटना मनसेचा पाठिंबा…

कुडाळ :-प्रतिनिधि*

खासगी लक्झरी बसद्वारे विनापरवाना मालवाहतूक विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांनी पुकारलेल्या आंदोलनास मनसे वाहतूक सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसेच्या मागणीनंतर जाग येऊन स्थानिक बुकिंग एजंट पाठोपाठ मालवाहक संघटना सुद्धा खासगी बस मालकांच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान परिवहन विभाग सिंधुदुर्ग मार्फत नियमानुसार योग्य कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरुन नियमबाह्रा वाहतूक रोखली जाईल असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे की, खासगी बस द्वारे होणाऱ्या विनापरवाना मालवाहतुकीवर कारवाई करून अवाच्यासव्वा वाढलेले तिकीट दर नियंत्रित करावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिवहन विभागास इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांनी गुरुवारी सकाळी आरटीओ चेक पोस्ट बांदा येथे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मनसे वाहतूक सेनेचे विजय जांभळे यांनी उपस्थित रहात पाठिंबा दिला.

मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई खासगी बस मधून मोठ्या प्रमाणात विनापरवाना मालाची वाहतूक होत आहे. मालाची वाहतूक गाडीच्या सीट वरून, स्लीपर कोचवरून सुद्धा होते. यामुळे याचा परिणाम गाड्याच्या तिकीट दरावर होतो व गाड्यांच्या तिकिटाचे दर येते जाते दोन हजार, तीन हजार आणि चार हजार वर पोहोचतात. याचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना भोगावा लागतो. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बुकिंग एजंटला सीटवरून मालवाहतूक केल्यामुळे बुकिंग साठी सीट सुद्धा उपलब्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे शासनास दरवर्षी विविध टॅक्स भरून चालणाऱ्या मालवाहू गाड्यांना भाडे मिळणे मुश्किल झाले आहे.

याच कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने परिवहनचे सिंधुदुर्ग जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. काळे यांना निवेदन देत सदर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती.

खाजगी बस मालकांच्या मनमानीवर आरटीओ मार्फत योग्य कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास मदत म्हणून रस्त्यावर उतरून विनापरवाना मालवाहतूक रोखली जाईल असा थेट इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!