*कोंकण एक्सप्रेस*
*झोळंबे गावातील आई माऊली आणि शंभू महादेवाचा न्हावण उत्सव २१ मार्च ला…*
*शुभम गवस/ दोडामार्ग*
झोळंबे गावच्या इतिहासातील पूर्वापार चालत आलेला रूढीचार, परंपरा, श्रद्धा, आणि भक्ती याचा अतूट संगम आणि भक्तिमय सोहळा याची अनुभूती देणारा उत्सव म्हणजे आई माऊली आणि शंभू महादेवाचा न्हावण उत्सव. जुन्या जाणत्या व्यक्तींनी चालू केलेली परंपरा पूर्वीपासून आजही तेवढ्याच उत्साहात पहायला मिळते. असाच हा शिवशक्ती चा सोहळा येत्या शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी संपन्न होत आहे.