*कोंकण एक्सप्रेस*
*भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रील्स स्पर्धेचे आयोजन*
*मालवण (प्रतिनिधी)*
भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भंडारी कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी आयोजित आणि कुणाल माणगांवकर पुरस्कृत रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दोन गटात होणार असून पहिला गट भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या आजी – माजी विद्यार्थी यांच्यासाठी असून त्यासाठी भंडारी कनिष्ठ महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वाटचाल हा विषय आहे. तर दुसरा गट खुला असून त्यामध्ये इतर महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, इतर व्यक्ती व क्रिएटर्स सहभागी होऊ शकतात, खुल्या गटासाठी कॉलेज जीवन हा विषय आहे.
स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रत्येकी प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० तसेच चषक व प्रमाणपत्र त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. १००० अशी पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपले रील्स व्हिडीओ bhandari_junior_college या इंस्टाग्राम अकाऊंटला फॉलो व कोलॅब करून अपलोड करावेत. व्हिडीओ अपलोड करण्याची अंतिम मुदत ५ एप्रिल आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण ४ मे रोजी मालवण येथे होणाऱ्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालय माजी विद्यार्थी मेळाव्यात करण्या येईल. अधिक माहितीसाठी भूषण मेतर – 9158953906, विठ्ठल सादये 9404775657, कॉलेज – 9405915298 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.