मालवणी संस्कृती चे चित्रण करुन प्रा. बापट सरांनी इथल्या मातीचे ऋण फेडले; श्रीकांत आपटे

मालवणी संस्कृती चे चित्रण करुन प्रा. बापट सरांनी इथल्या मातीचे ऋण फेडले; श्रीकांत आपटे

*कोकण Express*

*मालवणी संस्कृती चे चित्रण करुन प्रा. बापट सरांनी इथल्या मातीचे ऋण फेडले; श्रीकांत आपटे*

*फोंडाघाट महाविद्यालयात ग्रंथप्रकाशन*

*फोंडाघाट प्रतिनिधी*

या कॉलेज मध्ये प्रा. अविनाश बापट सर यांच्या संपूर्ण मालवणी बोलीतील दोन कादंबऱ्यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लॉकडाऊन मधलो हनिमून या कोरोना वर आधारित असलेल्या
ललित गद्य आणि विज्ञान यांचा संगम असलेल्या कादंबरी चे प्रकाशन संस्था अध्यक्ष सन्माननिय श्रीकांतजी आपटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
तर खालाटी वलाटी या दुसऱ्या मालवणी बोलीतील कादंबरीचे प्रकाशन प्राचार्य. प्रा.डॉ. सतीश कामत यांच्या हस्ते करण्यात आले
खालाटी वलाटी या कादंबरीत समुद्र किनाऱ्यावरील काही गावे आणि फोंडा घोणसरी या परिसरातील निसर्ग लोकजीवन संस्कृती यांचे चित्रण केले आहे मालवणी बोलीमध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार अगदी अत्यल्प असून मालवणी संस्कृती चे चित्रण करुन प्रा. बापट सरांनी इथल्या मातीचे ऋण फेडले असे प्रा. डॉ. सतीश कामत यांनी आपल्या भाषणात सांगितले तर अध्यक्ष आपटे साहेब यांनी बापट सरांचे मालवणी बोलीतील दोन्ही पुस्तके आम्हाला प्रकाशन करण्या साठी दिली याचा आम्हाला खूप आनंद झाला असे सांगितले
प्रा बापट यांनी आपल्या मनोगतात दोन्ही पुस्तकांमागील संकल्पना सांगितली व रावा प्रकाशन चे प्रकाशक श्री राहुल कुलकर्णी यांनी मालवणी बोलीतील कादंबऱ्या काढून नवीन
शिवधनुष्य पेलले आहे अस प्रा. बापट यांनी म्हटलं
यावेळी प्रा. बापट यांनी काही मालवणी कवितांचे वाचन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राणे सर यांनी केले यावेळी व्यासपीठावर लेखक प्रा. अविनाश बापट सर, प्रा.डॉ. सतीश कामत सर, अध्यक्ष श्रीकांत आपटे सर , प्रा राणे सर , प्रा जोईल सर उपस्थित होते कार्यक्रमाला फोंडा कॉलेज चे सन्माननीय प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!