*कोंकण एक्सप्रेस*
*कट्टा येथील वराडकर हायस्कूल मध्ये मराठी विभागामार्फत ” एक सकाळ साहित्यिकाच्या सहवासात” हा कार्यक्रम संपन्न*
*मालवण ः प्रतिनिधी*
आजच्या काळात शिक्षणामध्ये परदेशी भाषेचे ज्ञान आत्मसात करण्याचा एक प्रकारचा प्रघात पडला असताना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना मराठी भाषा शिक्षण संशोधन आणि अभ्यास करणे हा चौकटी बाहेरचा विचार करून त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असे प्रतिपादन मालवणच्या साहित्यिका सौ मेघना जोशी यांनी येथे बोलताना केले
कट्टा येथील वराडकर हायस्कूल मध्ये मराठी विभागामार्फत ” एक सकाळ साहित्यिकाच्या सहवासात” या कार्यक्रमात मालवणच्या साहित्यिका सौ मेघना जोशी यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे ऋषिकेश नाईक मराठी विभागाप्रमुख संजय पेंडूरकर, श्री.रीतेश जाभवडेकर, श्री महेश भाट , सौ दळवी सौ छाया कांनुरकर, भूषण गावडे आदी उपस्थित होते
प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी प्रस्ताविक करून स्वागत केले तर श्री समीर चांदरकर याने कविता सादर केली.
यावेळी बोलताना सौ मेघना जोशी म्हणाल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्राकडून राज्याला भरघोस आर्थिक मदत प्राप्त होईल याचा विचार करून भविष्यात मराठीतील करियर संधी विद्यार्थ्यांनी शोधून त्याचा लाभ घेतला पाहिजे असे सांगून त्या पुढे म्हणाल्या शब्दांचा वापर करताना विचारपूर्वक केला तर भाषा मौल्यवान होते. जागच्या जागी आणि जिथल्या तिथे हे खरंतर खूप सोपे शब्द. त्यांच्या वापरातूनही एक कथा निर्माण होऊ शकते याचे उदाहरण दिले.
यावेळी सौ जोशी यांनी मराठीचा सततचा वापर आणि दर्जेदार मराठीच्या वापराचा प्रयत्न करून आपले वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी सौ मेघना जोशी यांचा मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाप्रमुख संजय पेंडूरकर तर आभार श्री.रीतेश जाभवडेकर यांनी केले