कणकवली पंचायत समितीच्यावतीने ग्रा.पं.च्या महिला सदस्यांचा अभ्यास दौरा

कणकवली पंचायत समितीच्यावतीने ग्रा.पं.च्या महिला सदस्यांचा अभ्यास दौरा

*कोकण Express*

*कणकवली पंचायत समितीच्यावतीने ग्रा.पं.च्या महिला सदस्यांचा अभ्यास दौरा…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पंचायत समितीच्यावतीने ग्रामपंचायत महिला सदस्य आणि पदाधिकारी यांचा एक दिवशीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मालवण तालुक्यातील पेयरे येथे करण्यात आलेल्या मिरी लागवडीची पाहणी, आचरा येथे खेकडा पालन, व हडी येथील गोड्या पाण्यातील मासे पालन प्रकल्पाला भेट देऊन अभ्यास केला जाणार आहे.

कणकवली पंचायत समिती येथून हा दौरा सुरू झाला. यावेळी सभापती मनोज रावराणे यांच्या सह उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती दिलीप तळेकर,भाग्यलक्ष्मी साटम, सुजाता हळदिवे, मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, दिव्या पेडणेकर, राधिका सावंत, स्मिता मांडलीकर, सुचिता दळवी, महेश लाड, सुभाष सावंत आदींसह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!