*कोकण Express*
*कलमठ येथे वीज कनेक्शन तोडण्याचा प्रकार; ग्रामस्थ संतप्त*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कलमठ गावात विजेच्या थकीत ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची सुरवात आज करण्यात आली.कोणतीही पूर्व कल्पना नदेता ही कारवाई केली असल्याने ग्रामस्थ आणि महिला संतप्त झाले.ग्रामपंचा सदस्य संदीप मेस्त्री यांनी घटनास्थळी धाव घेत वीज अधिकाऱ्यांना धारेवर धरत वीज कनेक्शन तोडण्यास विरोध केला.तर थकीत बिलाची रक्कम हप्त्या हप्त्याने भरण्याची सवलत करून दिली.
बिलाची वसुली होत असेल तर सरकाचा फायदा होईल कनेक्शन तोडून कोणताही फायदा होणार नाही.तुम्ही थेट वीज कनेक्शन तोडून काय मिळणार आहात असा सवाल विजय कंपनीच्या अधिकाऱ्यांना संदीप मेस्त्री यांनी केला.त्यावर आम्हाला वीज कनेक्शन तोडण्याची लिस्ट प्राप्त झाली आहे.तुम्ही बिल भरा अन्यथा वीज पुरवठा कट करणार असे अधिकारी आणि वायरमन यांनी सांगितले. या दरम्यान ग्राहक आणि वीज कर्मचारी यांच्या चांगलीच खडाजँगी झाली.कलमठ ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री यांनी तुम्ही नोटीस न देता थेट वीज कनेक्शन तोडताच कसे ? ग्राहक जे पैसे देतात ते भरून घ्या आणि वीज बिलाची वसुली करा.वीज कनेक्शन तोडून जाणार असाल तर गावा बाहेर जाऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी थकीत रक्कमेची काही वसुली करून कनेक्शन पूर्वरत केले.