*कोकण Express*
*राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी अर्षद बेग*
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते तथा सावंतवाडी नगरपरिषदेचे जेष्ठ नगरसेवक श्री.राजू बेग यांचे पुतणे व बांधकाम व्यावसायिक अर्षद बेग यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिंधुदुर्गच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी केली.
जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार सेल महाराष्ट्र प्रदेश प्रमुख डॉ. ओंकार माळी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाने दिलेली जबाबदारी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा विश्वास अर्षद बेग यांनी व्यक्त केला. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून लवकरच भविष्यात जिल्ह्यातील अनेक युवक आपल्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा अर्षद बेग यांनी केला.

