कणकवली परबवाडीतील महिलांनी साजरा केला जागतिक महिला दिन

कणकवली परबवाडीतील महिलांनी साजरा केला जागतिक महिला दिन

*कोकण Express*

*कणकवली परबवाडीतील महिलांनी साजरा केला जागतिक महिला दिन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली परबवाडी येथील महिलांनी एकत्र येत जागतिक महिला दिन साजरा केला.
परबवाडी येथील ब्राम्हणदेव मित्रमंडळाच्या माध्यमातून महिलानी एकत्र येत नेहमीच्या रहाटगाडग्याला फाटा देत फनी गेम्स च्या माध्यमातून विरंगुळा अनुभवला. फनी गेम्स च्या माध्यमातून स्वतःतील कलागुणांना वाव दिला. मनसोक्त हळतखेळत खेळलेल्या फनी गेम्स मुळे महिलांनी रिचार्ज झाल्याचा अनुभव घेतला. यावेळी सौ नीलम ठुकरुल,सौ वंदना कामतेकर, सौ रश्मी मगम, सौ स्मिता परब, सौ संचिता परब, पूनम परब, सौ शीतल सरंगले, सौ भाग्यश्री परब, सौअस्मिता परब, सौ साक्षी परब, सौ स्नेहा राणे, शोभा परब, अर्चना सरंगले आदींसह परबवाडीतील महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!