*कोंकण एक्सप्रेस*
*कलमठमध्ये 20 फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा*
*कणकवली : प्रतिनिधी*
कलमठ येथील श्री गजानन महाराज सेवाश्रमात गुरुवार 20 फेब्रुवारीला श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकट दिन सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी धार्मिक विधी, दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, सायंकाळी 6 वा. झुणका-भाकरी प्रसाद वाटप, सायंकाळच्या सत्रात भजन, कीर्तन, हरिपाठ होणार आहे. तरी या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन महाराज सेवाश्रम यांच्यावतीने करण्यात आले आहे.