*कोंकण एक्सप्रेस*
*अपूर्वा किरण सामंत यांचे दूरदर्शी नेतृत्व*
*जुवे जैतापूरमध्ये रोजगार, उद्योग, आणि पर्यटन विकासावर विशेष मार्गदर्शन*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी , सागवे विभागातील जुवे जैतापूर आणि जैतापूर ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत अपूर्वा किरण सामंत यांनी सहभाग घेतला.या वेळी त्यांनी नव्या रोजगाराच्या संधी, उद्योग, व्यवसाय, पर्यटन विकास, आणि समुद्रालगतच्या सोयीसुविधांच्या विकासाबाबत मार्गदर्शन केले.
तसेच, स्थानिकांच्या समस्या आणि अडचणी समजून घेतल्या.समुद्र ही निसर्गाची देणगी आहे.तिचा विकास करताना रोजगाराच्या संधी निर्माण करून पर्यटनाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले.

