*कोंकण एक्सप्रेस*
*राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रत्नागिरी च्या दौऱ्यावर!!!*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.15 वाजता रेमंड हेलिपॅड, ठाणे येथे आगमन व हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 2.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने चंपक मैदान, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता जाहिर आभार सभा (स्थळ : चंपक मैदान, रत्नागिरी) दुपारी 4 वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड,ठाणेकडे प्रयाण.