झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना झालेली आसुरी मारहाण निंदनीय दोषी वर कठोर कार्यवाही व्हावी- विष्णू मोंडकर

झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना झालेली आसुरी मारहाण निंदनीय दोषी वर कठोर कार्यवाही व्हावी- विष्णू मोंडकर

*कोंकण एक्सप्रेस*

*झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना झालेली आसुरी मारहाण निंदनीय दोषी वर कठोर कार्यवाही व्हावी- विष्णू मोंडकर*

*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*

झाराप झिरो पॉईंट येथे मारहाण प्रकरणी दोषी वर कठोर कारवाईची मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा.श्री नितेशजी राणे साहेब ,पालकमंत्री तसेच मत्स्यविकास व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली असून याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या मारहाण करणाऱ्या हॉटेलचा मालक तनवीर करामत शेख यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी तसेच यामुळे जिल्ह्याची पर्यटन क्षेत्रात झालेल्या बदनामी विषयी तसेच या मारहाणीत पर्यटकांना त्रास देणाऱ्या त्याच्या हॉटेलमध्ये काम करणारे शराफत अब्बास शेख ,अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, परवीन शराफत शेख ,शाजमिन शराफत शेख ,तलाह करामत शेख सर्व राहणार झाराप खान मोहल्ला यांना तात्काळ अटक होण्यासाठी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांची पर्यटन महासंघ शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी सांगितलं.तसेच पोलीसानी स्वतःहून केस दाखल केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

जिल्हा हा पर्यटन असून दरवर्षी 15 लाखापेक्षा जास्त देश विदेशी पर्यटक या जिल्ह्यात येऊन पर्यटनाचा आस्वाद घेतात या पर्यटन वाढीमध्ये जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिकांनी आपल्या अतिथी भव या संस्कारिक संस्कृती मुळे जिल्ह्यात पर्यटनाच्या मूलभूत सुविधा उभ्या करून सागरी,कृषी,हिस्ट्री,मेडिकल क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पर्यटनासाठी असलेला जिल्हा म्हणून देश विदेशात नावारूपाला आणले आहे अश्या या पर्यटक प्रेमी जिल्हात अशा प्रकारचे निंदनीय आसुरी कृत्य करणाऱ्या व्यक्तींना कडक शासन होणे गरजेचे आहे.

सध्या गाडी ओव्हरटेक,अनावधाने झालेले चुकीचे पार्किग ऑनलाईन साईट वरून बुकींग किरकोळ कारणामुळे वाद हि आसुरीपणाने वागणे सुरु आहे येणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत अश्यापध्धतीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील त्याच बरोबर कोकणातील पर्यटनाला गालबोट लागत आहे झाराप येथे पर्यटकांसोबत झालेल्या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्ग पोलिसांनी घेवून संशयित आरोपींविरोधात स्वतः गुन्हा दाखल केला ह्या बद्दल जागरूक पोलीस यंत्रणेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत पण यापुढेही जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना वादविवाद तसेच त्यांना जिल्ह्यात सुरक्षित वातावरण देण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून पर्यटन हेल्पलाईन सुरु करणे गरजेचे आहे तसेच यासाठी राज्य सरकारला मान्यता असलेले पर्यटन पोलीस जिल्ह्यातील पर्यटन भागात नेमणे गरजेचे आहे.

सज्ज असून कोणताही प्रकार पर्यटकासोबत घडल्यास तात्काळ सिंधुदुर्ग पोलिसांना कळवावे तसेच पर्यटकांना आवश्यक वाटल्यास पर्यटन महासंघाच्या 9421153035 या हेल्पलाईन नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन पर्यटन महासंघातर्फे करण्यात आले असून या मारहाण झालेल्या पर्यटकांच्या पर्यटन महासंघ संपर्क करीत असून त्यांच्या बाबतीत एका घडलेल्या वाईट प्रसंगामुळे जिह्यातील नागरिक पर्यटन व्यावसायिकाबद्दल चुकीचे मत न बनवता त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना जिल्ह्यात बोलावून स्थानिक पर्यटन स्थळे निवास व्यवस्था मोफत करून जिल्ह्याचे संस्कारित अथिति भव आदरातिथ्य केले जाणार आहे अशीही माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!