*कोंकण एक्सप्रेस*
*खोक्रल येथील श्री शांतादुर्गा देवीचा वर्धापन दिन १२
फेब्रुवारीला*
*दोडामार्ग : शुभम गवस*
माघ पौर्णिमा शु.१५ शके १९४६ बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री शांतादुर्गा देवीचा वर्धापनदिन सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
सकाळी ११:०० वा. श्री शांतादुर्गा देवीचा अभिषेक,दुपारी १२:३० वा. देवीची महा आरती, दुपारी १:०० वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, संध्याकाळी ७:०० वा. ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन.रात्री ठीक ९:३० वाजता – सिध्देश्वर दशावतार नाट्य मंडळ खोक्रल यांचे महान पौराणिक दशावतार नाट्यकलाकृती सादरीकरण होणार आहे.

