*कोंकण एक्सप्रेस*
*निषेध करण्यासाठी उपस्थित राहा : शिवप्रेमी वैभव इनामदार यांचे आवाहन*
*दोडामार्ग तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार निवेदन*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
छत्रपती शिवरायांच्या बद्दल वाचाळ वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर ह्या विकृत प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी, तसेच भविष्यात अशी वक्तव्य करण्याचे धाडस कोणत्याही व्यक्ती मध्ये निर्माण होऊ नये या साठी या विकृत व्यक्तीवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी यासाठी तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात येणार आहे.
तरी तमाम शिव प्रेमीनी आज शुक्रवार दिनांक ०७ फेब्रुवार २०२५ रोजी दुपारी ठीक ४ वाजता तहसीलदार कार्यालय दोडामार्ग येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिवप्रेमी वैभव इनामदार यांनी केले आहे.

