सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

*सिंधुदुर्गनगरी : जि.मा.का*

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीमधील सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकत्यांचा गौरव करावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (व्यक्ती), साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवार दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार (संस्था) नमुद पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्था यांना प्रदान करण्यात येतो.या पुरस्कारासाठी जिल्ह्यामधील इच्छुक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थानी विहीत नमुन्यातील प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्वकागदपत्रासह सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in यासंकेत स्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!