राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे यश प्रशंसनीय -श्री अजयराज वराडकर

राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे यश प्रशंसनीय -श्री अजयराज वराडकर

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे यश प्रशंसनीय -श्री अजयराज वराडकर*

*मालवण : प्रतिनिधी*

भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थी सक्षम असला पाहिजे.राज्यातील व देशातील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असे अधिकारी तयार होतात.यासाठी अश्या परीक्षांची गरज असून विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत महत्वाची असून विद्यार्थ्यांचे हे यश प्रशंसनीय आहे तसेच यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी केलेले कार्य ही मोलाचे असून असाच प्रयत्न चालू ठेवून विद्यार्थ्यांचा विकास साधावा असे उद् गार भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरव चिन्ह (पदक) देऊन गौरविताना काढले.

या वेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टा या केंद्रावर झालेल्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षां 2024-25 च्या विशेष गुणवंत विद्यार्थी कु. हर्षदा किसन हडलगेकर (सुवर्ण पदक),कु.मयुरीका अमित मांजरेकर (रौप्य पदक),कुमार भिवा रमाकांत गावडे (कास्य पदक) यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल यांचा कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर व सचिव श्रीमती विजयश्री देसाई यांच्या हस्ते तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री.महेश भाट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या केंद्रावर एकूण 108 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे समाजशास्त्र प्रमुख श्री.एकनाथ श्रीधर राऊळ तसेच श्रीमती ज्योती नंदकिशोर मालवदे,श्री.समीर अशोक चांदरकर.श्री.बाळकृष्ण मल्लाप्पा वाजंत्री ,सौ.समीक्षा राजेश दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.

परीक्षेच्या यशस्वितेसाठी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीस कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर विश्वस्त ॲड.श्री. एस एस पवार उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर श्री.शेखर पेणकर सचिव श्री सूनीलजी नाईक सचिव श्रीमती विजयश्री देसाई सहसचिव साबाजी गावडे खजिनदार रवींद्रनाथ पावसकर,स्कूल व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, संचालक शिवराम गुराम, सौ.श्रुती वराडकर, सौ सुप्रिया वराडकर, सौ स्वाती वराडकर, श्री महेश वाईरकर, मार्गदर्शक डॉ.विश्वनाथ वराडकर ,सुहास वराडकर,प्रभाकर वाईरकर श्री.नारायण पेणकर, श्री व्हिक्टर डॉन्टस ,श्री .संतोष साटविलकर यांनी भावी वाट वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!