माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीला एसीबीने पुन्हा बोलावले

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीला एसीबीने पुन्हा बोलावले

कोंकण एक्सप्रेस

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीला एसीबीने पुन्हा बोलावले

उघड जबाब नोंदविण्यासाठी 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याबाबत पत्र

कणकवली ः प्रतिनिधी

उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचेकडून चौकशी सुरू आहे. सदर प्रकरणी आता या उघड चौकशीकामी जबाब नोंदविण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक व त्यांची पत्नी सौ. स्नेहा नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे 11 फेब्रुवारी 2025 रोजी उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.

सदर पत्रात म्हटले आहे की प्रतिबंधक कार्यालयाकडून सुरू असलेल्या उघड चौकशीच्या अनुषंगाने ५ डिसेंबर २०२२ रोजी ला.प्र.वि. कार्यालय रत्नागिरी येथे आपली पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांचेसह उपस्थित राहिला. परंतू लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्त्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागाहून सादर करणार असलेबाबत समक्ष सांगितल्याने तसा त्यावेळी प्राथमिक स्वरुपात आपला जबाब नोंदविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!