*कोकण Express*
*आंगणेवाडी जत्रोत्सव फक्त पुजारी व देवस्थान सदस्यांच्या उपस्थितीतच होणार…*
या विषयी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत. गर्दी आकर्षीत होईल अशा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये, सदर यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्ट व देवस्थान समितीचे सदस्य यांनीच पार पाडण्याचे असून याकरिता जास्तीत जास्त 50 व्यक्तींची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच यात्रेच्या ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यात्रेतील धार्मिक कार्यक्रमामध्ये अन्य व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई आहे. पारंपारिक धार्मिक कार्यक्रमांचे विधी करताना कोविड -19 बाबतच्या उपाययोजनांचा अवलंब करावेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षा पात्र अपराध केल्याचे मानले जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.

