*कोकण Express*
*कणकवली तालुका पत्रकार संघाची शुक्रवारी सर्वसाधारण सभा..*
कणकवली तालुका पत्रकार संघाची शुक्रवारी दि.५ मार्च २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.ही सभा उपरकर सभागृह तेली आळी कणकवली येथे होणार आहे. या सभेत जमा खर्च वाचन,आयत्यावेळी आलेल्या विषयावर चर्चा केली जाणार आहे.
तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत,खजिनदार माणिक सावंत व कार्यकारी मंडळाने केले आहे.

