*कोकण Express*
_*शाळांनी यावर्षी फी वाढवू नये – उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!*_
◾ जानेवारी महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने अनेक शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, शाळा प्रशासनाने नियमित फी आकारणार असल्याचं म्हटलं होतं.
◾त्यामुळे अनेक पालकांनी यास विरोध करत न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र, यावर आता उच्च न्यायलयाने पालकांना मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे.
◾ पालकांची अडचण समजून शाळांनी यावर्षी फी वाढवू नये. तसेच यावर्षी शाळेने फी टप्प्याटप्प्याने घ्यावी, असा आदेश दिला आहे.
◾ याशिवाय कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची परवानगीदेखील राज्य सरकारला देण्यात आली आहे.