फोंडाघाट महाविद्यालयात वाचन कौशल कार्यशाळा संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात वाचन कौशल कार्यशाळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट महाविद्यालयात वाचन कौशल कार्यशाळा संपन्न*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये इंग्रजी विभागामार्फत वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली.वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी.नेमके आणि चांगले वाचन कसे करावे ? याविषयी चर्चा करण्यात आली.

वाचनाच्या निवडीवरच वाचनाची गोडी अवलंबून असते.वाचनाने संस्कारित पिढी निर्माण होते आणि याच संस्कारीत पिढीवर देशाचे भवितव्य अवलंबून असते.असे प्रतिपादन प्रा. विनोद पाटील यांनी केले.त्यात ते पुढे म्हणाले की परिणामकारक वाचन असले पाहिजे.परिणामकारक वाचन वाचकावर परिणाम करू शकते.हृदय आणि मेंदू याचा समन्वय म्हणजे परिणाम.साधारणपणे प्रति मिनिट ५००  शब्द वाचणारा सर्वोत्कृष्ट वाचक असतो.दर्जेदार वाचनासाठी मन व नजर एकाग्र झाले पाहिजेत.वाचनातील अडथळे दूर करून वाचनाची गती वाढवली पाहिजे.

आपल्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.पुरंधर नारे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचले पाहिजे वारंवार वाचनापेक्षा चोखंदळ वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे. हल्लीच्या जगात वाचनाचा छंद नाहीसा झालेला दिसतो. तो छंद आपण स्वतः लावून घेतला पाहिजे.वाचन ही एक शिस्तबद्ध योजना आहे.चांगल्या वाचनाने आपल्या जीवनात एक शिस्त लागते.असे प्रतिपादन केले.

या कार्यशाळेचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ.विद्या मोदी यांनी केले तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले.कार्यशाळेला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!