साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रुपाली पाटील यांना आधुनिक सावित्री पुरस्कार भारतीय जमीन बंदर प्रतिष्ठान अधिकारी रेखा रायकर कुमार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन केले सन्मानित

साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रुपाली पाटील यांना आधुनिक सावित्री पुरस्कार भारतीय जमीन बंदर प्रतिष्ठान अधिकारी रेखा रायकर कुमार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन केले सन्मानित

*कोंकण एक्सप्रेस*

*साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रुपाली पाटील यांना आधुनिक सावित्री पुरस्कार भारतीय जमीन बंदर प्रतिष्ठान अधिकारी रेखा रायकर कुमार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन केले सन्मानित*

*सिधुदुर्ग*

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आधुनिक सावित्री पुरस्कारात सिंधुदुर्ग च्या साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रुपाली पाटील यांना हा पुरस्कार भारतीय जमीन बंदर प्रतिष्ठान दिल्लीच्या प्रशासकीय अधिकारी रेखा रायकर कुमार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानसहायता केंद्राच्या वतीने करियर कट्टा या उपक्रमांतर्गत आधुनिक सावित्री पुरस्काराचे वितरण बारामती येथीलदोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात वितरित करण्यात आला या कार्यक्रमा वेळी प्राचार्य डॉ. पी.व्ही.रसाळ,(अद्यक्ष, करियर संसद राज्यस्तरीय समिती ). रेखा रायकर कुमार, (प्रशासकीय अधिकारी, भारतीय जमीन बंदर प्राधिकरण,दिल्ली). (संस्थापक,अध्यक्षा,साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ) यशवंत शितोळे,
(अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र प्रो. डॉ. श्रीकुमार महामुनी प्राचार्य, शारदाबाई पवार.आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,बारामती)आधी उपस्थित होतेया कार्यक्रमादरम्यान दोन दिवसीय अधिवेशनामध्ये विविध वक्त्यांची चर्चासत्रे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध शिबिरे कार्यक्रम संपन्न झालेया दरम्यान राज्यातील 12 महिलांना हे पुरस्कार वितरित करण्यात आले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहस प्रतिष्ठान ही अपंग व सामाजिक विकासाच्या दृष्टीने काम करते या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांच्या गेले अनेक वर्षाच्या कार्याची यामहाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राने घेऊन गेल्या काही दिवसापूर्वी हे पुरस्कारराज्यातील उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी जाहीर केले होतेयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील रूपाली पाटील यांचा समावेश होता काल बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!