*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर प्राथमिक विभाग पालक मेळावा :बाल शिक्षणात पालकांची भूमिका*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर प्राथमिक विभाग मराठी सेमी प्राथमिक शिक्षण देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रयोगशिल प्राथमिक शाळा कणकवली शहरातील प्राथमिक शिक्षणात बालकांच्या सर्वागिण विकासाचा विचार करून मूल्याधिष्ठित शिक्षण देणारी आगळी वेगळी शाळा म्हणून प्रगती पथावर आहे विविध उपक्रमातून आणि जीवन कौशल्य यांची जोपासना करून बालकांचे व्यक्तीमत्व विकसित करण्याचा प्रयत्न बदलत्या शिक्षण पद्धतीतून निर्माण केले जात आहे.
पालक आणि बालक यांची भूमिका किती महत्वाचे आहे या विषयी इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांच्या पालकांचा मेळावा घेण्यात आला मुलांच्या शिक्षणात शालेय वातावरण आणि भौतिक सुविधा निर्माण करून प्रचलित अभ्यासात पालकांची भूमिका या विषयी मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी मार्गदर्शन करून पालकांना बालकांच्या शिक्षणाच्या गरजा विकसित करण्यासाठी मदतीचे आव्हान ही केले.यामध्ये संरक्षण भिंत ‘ सुंदर गेट ‘ वहान तळ ‘ बालोद्यान ‘ व्यायाम साहित्य ‘ भव्य क्रीडांगण यांच्या विकासासाठी आर्थिक मदतीचे पालकांना आव्हान करण्यात आले.
या मेळाव्यात प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ श्वेता करंबेळकर मॅडम यांनी शैक्षणिक प्रगतिचा आढावा घेऊन शिस्त आणि नियम यांच्या पालनाविषयी मार्गदर्शन केले.पालकांनी ही आपले शिक्षण विषयक विचार मनमोकळे पणाने मांडून पालक मेळाव्याला उत्तम प्रतिसाद दिला.जेष्ठ अध्यापक श्री अच्युतराव वणवे सरांनी शाळेच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक प्रगती या विषयी मार्गदर्शन करून आदर्श शिक्षण निर्माण करण्यासाठी पालकांना मदतीचे आव्हान करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नौकुडकर मॅडम यांनी केले आभार सौ खुडकर मॅडम यांनी मानले. यावेळी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

