*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत विनय सावंत प्रथम*
*सिंधुदुर्गनगरी :प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन,सावंतवाडी आयोजित “जिल्हास्तरीय रायफल शूटिंग पीपसाईट” या प्रकारामध्ये विनय शिवराम सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवत चषकावर आपले नाव कोरले.विनय सावंत हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पडवे गावचा रहिवासी आहे.तसेच न्यू इंग्लिश स्कूल कसाल हायस्कूलचा तो विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.