२८ डिसेंबरला कासार्डे माध्य- व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

२८ डिसेंबरला कासार्डे माध्य- व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*२८ डिसेंबरला कासार्डे माध्य- व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

कासार्डे विकास मंडळ संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आणि निवृत्त शिक्षकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ शनिवार दि. 28 डिसेंबर2024 रोजी स.9.30 वा.मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष मनोज दत्ताराम शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.तर कार्यक्रमाला भारतीय इतिहास संकलन समिती तथा जिल्हा संयोजक विज्ञान भारती सिंधुदुर्गचे सदस्य संदीप यशवंत राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर प्रसिध्द समुपदेशक आणि मोटिव्हेशनल स्पिकर अविनाश वालावलकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सरचिटणीस तथा स्कूल कमिटी चेअरमन रोहिदास नकाशे आणि स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांची यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.याशिवाय या कार्यक्रमाला कासार्डे विकास मंडळ,मुंबईचे इतर पदाधिकारी,सदस्य, शालेय शिक्षण समिती व स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्यही उपस्थित राहणार आहेत.

या भव्य कार्यक्रमात प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एम.डी.खाड्ये,एन.सी. कुचेकर,माजी पर्यवेक्षक एस.डी.भोसले यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.याशिवाय प्रशालेतील कला, क्रीडा संस्कृतीक क्षेत्रातील तसेच विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
रविवारी दि. 29 डिसेंबर रोजी सायं ६ ते रात्रौ ९ वा पर्यंत प्रशालेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनपर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

या सर्व कार्यक्रमाला पालक,माजी विद्यार्थी,ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रशालेच्या प्राचार्या बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे आणि शालेय मुख्यमंत्री शुभम नारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!