वैभववाडीत नगरपंचायतीने विनामास्क फिरणा-या २५ जणांवर दंडात्मक कारवाई..

वैभववाडीत नगरपंचायतीने विनामास्क फिरणा-या २५ जणांवर दंडात्मक कारवाई..

*कोकण Express*

*वैभववाडीत नगरपंचायतीने विनामास्क फिरणा-या २५ जणांवर दंडात्मक कारवाई..*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

_राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमनाचा धोका वाढत चालला आहे. रविवारी सकाळी वैभववाडी नगरपंचायतीने विनामास्क फिरणा-या २५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारला आहे.राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होताना दिसून येत आहे. सोशल डिस्टन्स, विनामास्क फिरणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने रविवार सकाळी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने विनामास्क फिरणा-या २५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत नगरपंचायतीने ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.ही कारवाई न. पं. मुख्याधिकारी सुरज कांबळे, पोलिस उपनिरीक्षक श्री. देसाई, न. पं. कर्मचारी सचिन माईणकर, शांताराम पवार, मंगेश तांबे, मधुकर इंदप, सुनील निकम, पो. नाईक श्री. साखरे आदींनी केली._

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!