नांदगाव तोंडवली येथे सापडलेले खवले मांजर वनविभागाकडे सुपुर्द

नांदगाव तोंडवली येथे सापडलेले खवले मांजर वनविभागाकडे सुपुर्द

*कोंकण एक्सप्रेस*

*नांदगाव तोंडवली येथे सापडलेले खवले मांजर वनविभागाकडे सुपुर्द*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील नांदगाव तोंडवली येथे खवले मांजर काल रात्री ११.३० च्या सुमारास तेथील स्थानिक ग्रामस्थ प्रभाकर चिके यांना कुत्रे पाठलाग करताना निदर्शनास आल्याने त्याला सुरक्षित पणे कुत्र्यांपासून बचाव करत वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की,नांदगाव तोंडवली खंड येथील रहिवासी असलेल्या प्रभाकर चिके यांचे घर आहे.रात्री ११.३० सुमारास त्यांना बाजूलाच काही रानटी कुत्रे पाठलाग करताना आवाज येताच आवाजाच्या दिशेने जात पाहीले असता खवले मांजर दृष्टीस पडले. कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी बाजुला असलेल्या वरद कुडतरकर यांच्या मदतीने सुरक्षित ताब्यात घेतले व कुत्र्यांपासून बचाव करुन तात्काळ नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर व सर्प मित्र पंढरी वायंगणकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

पंढरी वायंगणकर यांनी तातडीने फोंडाघाट येथील वनविभागाचे खोत यांच्या शी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.लगेचच उपवनसंरक्षक मा.श्री नवकिशोर रेड्डी,सहाय्यक वनसंरक्षक मा.श्री सुनील लाड,वनक्षेत्रपाल कणकवली श्री राजेंद्र घुनकरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल फोंडाघाट श्री धुळू कोळेकर यांनी ताब्यात घेऊन त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

खवले मांजर जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून समाजात असलेल्या गैरसमजामुळे दुर्मिळ होत चाललेली वन्य जीवांची प्रजात आहे. खवले मांजर वन्यजीव अधिनियम 1972 मधील शेड्युल एक मध्ये असून त्याला डिवचने पकडणे त्याची शिकार करणे हा गुन्हा आहे.

यावेळी वनपाल फोंडाघाट चे धुळू कोळेकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, पोलीस पाटील विजय मोरये, पंढरी वायंगणकर, प्रभाकर चिके, सर्पमित्र बंटी पाटील, रिद्धेश तेली, ग्रामस्थ तुषार मेस्त्री, प्रविण मोरये श्रीकांत टाकळे आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वनपाल फोंडाघाट चे श्री धुळू कोळेकर यांच्या सुरक्षित पणे ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!