संविधानाची विटंबना करणाऱ्यांना वेळीच पायबंद घाला -फुले,शाहू,आंबेडकर विचारमंचची मागणी

संविधानाची विटंबना करणाऱ्यांना वेळीच पायबंद घाला -फुले,शाहू,आंबेडकर विचारमंचची मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*संविधानाची विटंबना करणाऱ्यांना वेळीच पायबंद घाला -फुले,शाहू,आंबेडकर विचारमंचची मागणी*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना कोणत्याही परिस्थितीत माफ करू नका,जे फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना वेळीच पायबंद घाला, अशी मागणी फुले शाहू आंबेडकर विचारमंचातर्फे सरकारकडे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन मंचातर्फे वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयात देण्यात आले.तहसील अनुपस्थित असल्यामुळे महसूल अधिकारी लक्ष्मण गावडे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे की,या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले असून हा भारतीय राज्यघटनेचाच अवमान आहे. सदर घटनेतील संशयिताला लोकांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले असले तरी अजूनही या प्रकरणातील तीन ते चार समाजकंटक फरार आहेत.संविधान व पुतळ्याची नासधूस करणारा सदर व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे भासविण्यात येत असले तरी या घटनेमागे मोठे कारस्थान शिजलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपला देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेवर चालत असून संविधानाचा अवमान हा देशाचा अवमान आहे.त्यामुळे परभणी जिल्हयात घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आहे.सदर समाजकंटकांनी असे कृत नेमके का आणि कशासाठी केले याचा शोध घेऊन दृष्ट भावनेने केलेल्या या कृतीविरोधात शासनाने कडक पावले उचलून दोषींवर सक्त कारवाई करावी,जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद बसेल, संविधनाची विटंबना सरकारने कोणत्याही परिस्थितीत खपवून घेऊ नये.फरार समाजकंटकांचा तात्काळ शोध घ्यावा. अशा घटनांमागे असलेल्या विघातक शक्तींचाही शोध घेण्यात यावा.देशात बंधुता आणि एकात्मकता अबाधित ठेवणाऱ्या संविधानची विटंबना करणाऱ्या समाजकटंकांचा आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारमंचातर्फे तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत तसेच सध्या देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या न काही दृष्ट प्रकार सुरू आहेत त्यावर वेळीच पायबंद घालावा.सरकारने ही घटना गांभीर्याने घेऊन संविधानाचा अनादर करणाऱ्यांवर कडक करवाई करावी.संविधानाबाबत निष्ठा न ठेवणाऱ्यांविरोधात सरकारने कडक कायदा करून समाजकंटकांना कडक शिक्षा करावी.महाराष्ट्र हे पुरोगामी विचारणीचे राज्य आहे.त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी,अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी फुले शाहू आंबेडकर विचारमंचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव महेंद्र मातोंडकर, सहसचिव लाडू जाधव, खजिनदार के. जी. गावडे, सदस्य प्रा. वसंत नंदगिरीकर, रामचंद्र जाधव, वाय. बी. कदम, माजी उतनगराध्यक्ष वामन कांबळे, होमगार्डचे तालुका समादेशक संतोष मातोंडकर व निवृत्त शिक्षक अरुण होडावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!