गोपुरी आश्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार मार्गदर्शन वर्ग संपन्न

गोपुरी आश्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार मार्गदर्शन वर्ग संपन्न

*कोंकण Express “

*गोपुरी आश्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार मार्गदर्शन वर्ग संपन्न*

गोपुरी आश्रमातर्फे विद्यार्थी वर्गासाठी रविवारची ‘जीवनमूल्य शिक्षण शाळा’ सुरू करण्यात आली आहे. या शाळेत गेल्या रविवारी १० नोव्हेंबर रोजी ‘कोलाज चित्र’ प्रकाराची माहिती देण्यात आली. आज हस्ताक्षर कसे सुधारावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर येथील हस्ताक्षर सुधार प्रशिक्षक अश्विनी जगदीश तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या हस्ताक्षर सुधार शाळेत विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या सजग व्यक्तिमत्व विकासाठी ‘जीवनमूल्य शिक्षण शाळा’ गोपुरी आश्रमात सुरू करण्यात आली असून ती प्रत्येक महिन्यातून दोन रविवारी भरणार आहे. आज हस्ताक्षर सुद्धा मार्गदर्शनाबरोबरच आचरा येथील रामचंद्र कुबल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सुंदर गोष्ट ही सांगितली.
या शाळेला शुभेच्छा देण्याकरिता कणकवली येथील डॉ. रश्मी पेंडूरकर उपस्थित होत्या. आजच्या जीवन मूल्य शिक्षण शाळेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गोपुरी आश्रमाचे सचिव श्री विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते संदीप सावंत, विनायक सापळे, सुरेश रासम, सदाशिव राणे गुरुप्रसाद तेंडुलकर यांनी विशेष मेहनत घेतली. अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना ‘खरा तो एकची धर्म’ हे साने गुरुजींचे गीत सांगितले. आजच्या १२५ मुले उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!