*कोंकण Express*
*जळालेल्या गाडीतील भंगार चोरी, निपाणीतील सहा जण ताब्यात*
*आंबोली पोलिसांची कारवाई; टेम्पो सह साहित्य जप्त*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
आंबोली घाटात झालेल्या गाडीतील भंगार चोरी केल्या प्रकरणी निपाणी येथील सहा जणांना आंबोली पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून टेम्पो सह चोरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात करण्यात आली. आंबोली घाटात जळालेल्या कंटेनर मधील भांडी ते चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आली. अर्जुन उमाजी गोसावी (वय २३), अक्षय नेताजी गोसावी (वय २५), विशाल गुलाब गोसावी (वय २७), राहुल मारुती कोरवी (वय २७ सर्व रा. निपाणी- बेळगाव), जय नेताजी गोसावी (वय २४, रा. कलमठ- कणकवली), सुनील धीरज माळी (वय २८, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात यश आल्यामुळे या सहाही जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. उद्या जाणार येथील न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर-गडहिंग्लज येथील भगवान गुरव यांचा आयशर टेम्पोला पंधरा दिवसापूर्वी घाटात मुख्य दरडीच्या परिसरात आग लागली होती. या आगीत गाडीसह गाडीत असलेले भांडी अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती. घटनेनंतर गुरव यांनी त्याच ठिकाणी हे साहित्य ठेवले होते.अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती. घटनेनंतर गुरव यांनी त्याच ठिकाणी हे साहित्य ठेवले होते.
दरम्यान त्या ठिकाणी भांडी व अन्य साहित्य असल्याची संधी साधून निपाणी येथील या सहाही जणांनी ही भांडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती आंबोली पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन सहाही जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
दरम्यान आंबोली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सर्व चोरीला गेलेले साहित्य जप्त करण्यात आले. परंतु त्यांच्या ताब्यात असलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे. उद्या त्यांना सावंतवाडी न्यायलात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही कारवाई आंबोली टूर क्षेत्राचे हवालदार दत्ता देसाई, मनीष शिंदे, दीपक शिंदे, अभिजीत कांबळे, राजेश नाईक आदीच्या पथकाकडून करण्यात आली.

