चौके येथील भराडी देवीचा जत्रोत्सव २२ रोजी

चौके येथील भराडी देवीचा जत्रोत्सव २२ रोजी

*कोंकण Express* 

*चौके येथील भराडी देवीचा जत्रोत्सव २२ रोजी*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील चौके गावची ग्रामदेवता श्री देवी भराडीचा वार्षिक जत्रोत्सव दि. २२ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यावेळी सकाळी मानकऱ्यांच्या उपस्थितीत मानाची ओटी भरल्यानंतर आलेल्या भाविकांची ओट्या भरण्यासाठी सुरुवात केली जाते. यावेळी नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमाला सुरुवात होईल. रात्री भराडी मातेच्या पालखीची मंदिराभोवती प्रदक्षिणा होणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत, मानकरी, ग्रामस्थ, भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.

मंदिरातील सभा मंडप, देवीचा प्रमुख गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. रात्री चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठीचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन गावकरी मंडळींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!