कोळंब येथे २५ रोजी गवळदेव उत्सव

कोळंब येथे २५ रोजी गवळदेव उत्सव

*कोंकण Express*

*कोळंब येथे २५ रोजी गवळदेव उत्सव*

*मालवण : प्रतिनिधी*

कोळंब भटवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर येथे गचळदेव उत्सव व ७ वा वर्धापन दिन सोहळा दि. २५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता मूर्तीपूजा व अभिषेक, ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद व तीर्थप्रसाद, ३ वाजता श्री चरणी ग्रामस्थांची गान्हाणी, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने, रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रेकॉर्ड डान्स व स्थानिक कलाकारांची एकांकिका हे कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!