*कोंकण Express *
*एकनाथ नाडकर्णी यांचे भाजप पक्षातून निलंबन*
*पक्षविरोधी कामाचा ठपका*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
भाजप जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी यांचे भाजप पक्षातून निलंबन करण्यात आले असून, पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार उभे असताना देखील त्यांनी विरोधी उमेदवाराचे काम केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज दिले आहे.

