राणेंनी हिंम्मत असेल तर उध्दव ठाकरेंना अडवून दाखवावे परशुराम उपरकर

राणेंनी हिंम्मत असेल तर उध्दव ठाकरेंना अडवून दाखवावे परशुराम उपरकर

*कोंकण Express*

*राणेंनी हिंम्मत असेल तर उध्दव ठाकरेंना अडवून दाखवावे परशुराम उपरकर*

*मुलांच्या बालहट्टासाठी खा. नारायण राणेंना खळा बैठका घेण्याची वेळ ; सुक्या धमक्यांना कोण घाबरत नाही*

*कणकवली ः प्रतिनिधी*

उद्धव ठाकरे १३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सभेसाठी येणार आहेत. यावेळी राणेंनी त्यांना इकडे येऊन रस्त्यावरून जाऊन दाखवा, असा इशारा दिला. त्यावर रस्ता हा राणेंच्या बापाचा नाही. हा सर्वसामान्य नागरिकांचा रस्ता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवून दाखवा त्यांच्यासोबत असलेले व तुमच्या वेळी असलेले जुने शिवसैनिक आता बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अशा सुक्या धमक्यांना कोण घाबरत नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्याच स्टाईलने उत्तर देतील, हे राणेंनी लक्षात ठेवावे, असा इशारा शिवसेना नेते, माजी आ. परशुरान उपरकर यांनी दिला आहे. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे भाजपच्या स्टार प्रचारक यादीत असताना आपल्या मुलाचे बालहट्ट पुरवण्यासाठी खळा बैठक घेत आहेत. नारायण राणेंनी ११९०-९५ ची निवडणूक आठवावी. राणे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते. त्यावेळचे शिवसैनिक नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी काम करत होते. तेव्हा राणे फक्त दोन ते चार दिवस मतदार संघात यायचे, आणि आता त्याच नारायण राणेंना स्वतःच्या मुलासाठी खळा बैठक, छोट्या बैठका घ्याव्या लागतात. हीच खरी नारायण

राणेंची अधोगती आहे, असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

नारायण राणे शिवसेनेत तसे काँग्रेसमध्ये स्टार प्रचारक झाले. तेव्हा तिथे काँग्रेसची सत्ता गेली आहे. दीपक केसरकर यांनी एकदा असे म्हटले की, राणे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षात जातात त्या त्या ठिकाणची सत्ता जाते. तसेच यावेळी देखील होणार आहे. राणे ज्या ठिकणी गेलेत किंवा मुलगा जिथे गेलाय तिथे सत्ता जाणार आहे. आजच्या घडीला राणे हतबल झालेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा १३ तारीख ला होणार असल्याचे पत्रकारांनी विचारले. असता, माझी सभा साडेतेराला होणार हे.! हे कशाच्या आधारे सांगितलं आहे? जुने शिवसैनिकच राणेंना धडा शिकवतील, असा विश्वास परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला.

राणेंचे सर्वच बाबतीत पोलखोल झाले आहेत. एकीकडे राणे सांगत आहेत की, आपण २०० कोटींच ट्रेनिंग सेंटर आणल आहे. मात्र तिथे फक्त बोर्ड लावलेला आहे. त्या पलीकडे तिथे काहीही बदल झालेले नाही. १९९९ मध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री असताना विमानतळाला दगड लावला, त्यानंतर विविध पद भूषवली. मात्र ते जैसे थेच राहिले. राणेंच्या ट्रेनिंग सेंटरला किंवा राणेंच्या

फसव्या योजना लोकांना कळून चुकल्या आहेत आणि राणेंना देखील कळून चुकले आहे की, आपल्या मुलाचा पराभव होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!