*कोंकण Express*
*जनता जनार्दन आणि मायलेकीच्या आशीर्वादाने सावंतवाडीतील विधानसभा मतदारसंघात एका नवख्या ३६ वर्षाच्या तरुणाला निवडून देतील.–विशाल परब*
*विविध पक्षाचे नेते मंडळी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला येत असले तरी माझे स्टार प्रचारक “शेतकरी बांधव”आणि तरुण युवक व गोरगरीब जनता*
*येत्या 23 तारखेला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून बदल हा विशाल परब यांच्या रूपाने नक्कीच दिसेल. हा माझा विश्वास*
*सावंतवाडी/प्रतिनिधी*
जनतेच्या आशीर्वादाने मी आज राज्यभर पोचलो असून, माझ्या मागे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता उभी राहून परिवर्तन घडवेल असा विश्वास त्यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यावेळी आपण कोणावरही टीका टिप्पणी करणार नसून, माझ्यासारखे हजारो विशाल परब तयार होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला माझ्या विजयाचा गुलाल उधळला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की पक्षाने नियमानुसार माझ्यावर कारवाई केली असली तरी मी कोणावरही नाराज नाही पक्षाने त्यांचे काम केले असले तरी ही माझी निष्ठा बदलणार नाही 23 नोव्हेंबरला गुलाल मी जनतेस म्हणून येणार इतर उमेदवारांच्या प्रजासाठी विविध नेते मंडळी जरी स्टार प्रचारक म्हणून येत असले तरी माझ्या प्रचाराला मात्र शेतकरी बांधव तरुण युवक आणि जनता हेच माझे स्टार प्रचारक असतील असे स्पष्ट केले भविष्यात हा एक नवका युवक विधानसभेत आपल्याला दिसेल कष्टकरी शेतकरी बांधवांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल या सावंतवाडी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारीचा प्रश्न आहे युवक बेरोजगार आहे हा रोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम मी कटिबद्ध राहीन जनतेतील युवकांच्या दोन हाताला काम कसे मिळेल हे माझे विजय असेल आणि शेवटी या जाऊन थोडे विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची जबाबदारी माझ्यावर असेल आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने पूर्ण करेन हा विश्वास या ठिकाणी मी देतो

