*कोंकण Express*
*संदेश पारकर यांनी दिल्या शिरगाव निमतवाडी येथे सदिच्छा भेटी!
*घराणेशाहीला शिरगाव गावातून हद्दपार करण्यासाठी संदेश पारकर सारखा आमदार पाहिजे : ग्रामस्थांनी केल्या भावना व्यक्त*
*देवगड प्रतिनिधी*
तालुक्यातील शिरगाव निमतवाडी येथील संजय राणे आणि जितू राणे यांच्या घरी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी.
यावेळी निमतवाडीतील 100% संदेशभाई पारकर यांनाच मतदान करणार असा निश्चय करण्यात आला. मी आमदार तर तुम्ही आमदार या टॅगलाईनची गावात होते जोरदार चर्चा. घराणेशाहीला शिरगाव गावातून हद्दपार करण्यासाठी संदेश पारकर सारखा आमदार पाहिजे अशा भावना येथील ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या.
यावेळी संतोष राणे, विनायक सतरकर, जितेंद्र सतरकर, जयेश राऊळ, जगदीश राऊळ, बाळकृष्ण चव्हाण,नाना सतरकर, साहिल राणे, जितू राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

