*कोंकण Express*
*आमदारकी स्वतःसाठी नको चांगले करेन ते जनतेसाठी निलेश राणे*
*मालवण ः प्रतिनिधी*
मला आमदारकी स्वतःसाठी नको आहे. जनतेची सेवा करायची आहे. जो मतदारसंघ राणे साहेबांचा म्हणून ओळखला जायचा ति ओळख पुन्हा विकासातून मिळवायची आहे. मला फोटोसेशन, जनतेची दिशाभूल करायची नाही. खोटे प्रवेश घ्यायचे नाहीत. तर शेतकरी, मच्छिमार, कष्टकरी, व्यापारी, तरुण या सर्वांसाठी काम करायचे आहे. विधिमंडळाच्या, मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोमातेची हत्या करण्यासाठी जी वाहने जात होती त्याना गोरक्षकांनी सिंधुदुर्गात अडवले. त्यावेळी त्या गो रक्षकांच्या विरोधात विधिमंडळात बोलणाऱ्या येथील आमदाराचे कार्य निष्क्रिय आहे. असे सांगत मतदारसंघातील असुविधा बाबत निलेश राणे यांनी भाष्य केले. विकास ठप्प आहे. जिल्हा रुग्णालय दयनीय अवस्था आहे. रस्ते, वीज या समस्या ही आहेत. स्पोर्ट्स क्लब नाही. काहीच नाही. हे सगळे आणायचे आहे. कणकवली, सावंतवाडी मतदारसंघसारखा हा मतदारसंघ विकासात गतिमान करायचा आहे. राणे साहेबांसारखे जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करायचे आहे. असे महायुती उमेदवार निलेश राणे यांनी भाजपा मेळाव्यात बोलताना सांगितले. उमेदवारी बाबत महायुती वरिष्ठ नेते यांचे आभार मानताना भाजपा, शिवसेना पदाधिकारी ज्या एकसंघपणे माझ्या विजयासाठी मोठे मताधिक्य मिळवण्यासाठी काम करत आहेत. त्या सर्वांचे आभार. तुमच्या हक्काच्या माणसाला सेवा करण्याची संधी द्या. असे आवाहन निलेश राणे यांनी केले. मालवण येथील भाजपा मेळाव्यात त्यांनी संवाद साधला.

