हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम महिलांचा दाखवलेल्या प्रवेशात एक ही महिला हरकुळ गावातील नाही – फैयाज खान

हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम महिलांचा दाखवलेल्या प्रवेशात एक ही महिला हरकुळ गावातील नाही – फैयाज खान

*कोंकण Express*

*हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम महिलांचा दाखवलेल्या प्रवेशात एक ही महिला हरकुळ गावातील नाही – फैयाज खान*

*मुस्लिम समाज आपल्या बाजूने दाखवण्याचा आमदार नितेश राणेंचा प्रयन्त*

*जनतेची दिशाभूल करण्यासाठी दाखवले जातात खोटे प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम महिलांचा आज आमदार नितेश राणेंनी प्रवेश दाखवला सद्य स्थितीत त्या पैकी एकही महिला ही हरकुळ बुद्रक गावातील नाही. हा फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी दाखवलेला खोटा प्रवेश आहे अशी टीका फैयाज खान यांनी केली आहे. दरवेळी मुस्लिम बांधवांवर समाजात तेढ निर्माण होईल असे भाष्य करणारे नितेश राणेंचा मुस्लिम समाज आपल्या बाजूने आहे दाखवण्याचा हा खोटा प्रयन्त आहे. आमदार राणे यांना खुश करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते असलेले इम्रान शेख यांचा हा केविलवाणा खोटा प्रयन्त आहे. कणकवली शहरात असलेला आपला अनाधिकृत स्टॉल वाचवण्यासाठी इम्रान शेख यांचा हा डाव आहे. हरकुळ बुद्रुक गावातील मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्याशी ठाम पाठीशी राहणार व जास्तीत जास्त मतांनी संदेश पारकर विजयी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!