*कोंकण Express*
*आगीत जळालेल्या आर.बी.दुकानाची ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांनी केली पाहणी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील आर. बी. बेकरी आणि बर्डे मेडिकल व राजू गवाणकर यांच्या कार्यालयाला १ नोव्हेंबर रोजी ४ वाजता लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
तसेच या ऐन दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मीपूजनादिवशी घडलेल्या या घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केले.

