संजय आंग्रे यांना बढती | शिवसेना उपनेते पदी नियुक्ती

संजय आंग्रे यांना बढती | शिवसेना उपनेते पदी नियुक्ती

*कोंकण Express*

*संजय आंग्रे यांना बढती : शिवसेना उपनेते पदी नियुक्ती*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र*

*सिंधुदुर्ग :*

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांना पक्षात बढती देण्यात आली आहे. त्यांना शिवसेना उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली असून मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना याबाबत नियुक्तीपत्र दिले.

नियुक्ती नंतर संजय आंग्रे म्हणाले, मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योगमंत्री श्री. उदय सामंत साहेब आणि आमदार श्री रवींद्र फाटक साहेब यांचे मनःपूर्वक आभार ! शिवसेना पक्षाच्या ‘शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्य’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे, याचा मला अभिमान आहे. पक्षातील या महत्त्वपूर्ण भूमिकेतून हिंदुत्व, आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार या सर्व गोष्टींच्या प्रसारासाठी मी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी, पक्षवाढीसाठी आणि शिवसेनेच्या बळकटीसाठी मी पूर्ण निष्ठा, जोम आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहीन.

या जबाबदारीसाठी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि माझे सर्वस्व पक्षाच्या सेवेसाठी अर्पण करण्यास सदैव तत्पर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!