*कोंकण Express*
*जिल्ह्यात परशुराम उपरकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच कार्यकर्ते शिल्लक..*
*शिवसेना ओरोस विभागीय संघटक श्री.संतोष परब यांनी घेतला खरपूस समाचार..*
जिल्ह्यात परशुराम उपरकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच कार्यकर्ते शिल्लक,जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांवर टीका करूनच उपरकरांचं उरलं सुरलं दुकान सुरु,इतरांनी किती पक्ष बदलले यावरून दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा तुम्हांला कोणताही पक्ष दारात का उभं करत नाही याचे आत्मपरीक्षण करा.माहिती अधिकार व वैयक्तिक टीका याच्यावर चाललेले उपकरांचे दुकान बंद होण्याच्या मार्गावर असल्याने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी व राज्य सरकार मधील नेत्यांवार टीका करून उद्धव ठाकरे परत पक्षात घेतील यासाठी उपरकरांची केविलवाणी धडपड सुरु आहे
जिल्ह्याच्या विकासात उपरकरांचे योगदान काय? कोणताही पक्ष दारात उभं करत नाही यावरून आपली पात्रता ओळखणूच स्वतःची बडबड बडबड करावी.आणि त्यांच्या शिल्लक कार्यकर्त्यांनी रुपेश पावसकरांना इशारे देण्यापेक्षा जिल्ह्याच्या राजकारणात आपली काय किंमत आहे ते अगोदर तपासावे,रुपेश पावसकरांना हजार पक्ष संघटनेत घेतात आणि तुम्हाला दारावरून हाकलून का देतात याचे आत्मपरीक्षण करा
कुणी पक्षात घेतं का यासाठी दर आठवड्याला मुंबई दौरे करणाऱ्या उपरकरांनी जिल्ह्याच्या राजकारणातून निवृत्ती घ्यावी तसेही राजकीय पक्षांनी तुम्हाला घरी बसवलेलंच आहे हे लक्षात असू द्या