कणकवली – ग्लोबल असोसिएटला उच्च न्यायालयाचा दिलासा….!

कणकवली – ग्लोबल असोसिएटला उच्च न्यायालयाचा दिलासा….!

*कोकण Express*

*कणकवली – ग्लोबल असोसिएटला उच्च न्यायालयाचा दिलासा….!*

*कणकवली भाजी मार्केट प्रश्नी नगरपंचायतने ग्लोबल असोसिएटला दिलेली कलम ५४ ची नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द….!*

*तर कायदेशीर बाबींची पूर्तता करून अन्य नोटीस देण्याची नगरपंचायतला मुभा कायम!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरातील नगरपंचायतच्या भाजी मार्केट आरक्षित जागेवर बांधण्यात येत असलेल्या भाजी मार्केट च्या इमारतीला नगरपंचायतीने बजावलेली एमआरटीपी अँक्टची कलम ५४ ची नोटीस उच्च न्यायालयाने रद्द ठरवत याचिकाकर्ते ग्लोबल असोसिएटला दिलासा दिला आहे. त्याच बरोबर कायदेशीर बाबींची पूर्तता करत नगरपंचायतने पुन्हा नव्याने नोटीस बजावण्याची ही मुभा कायम ठेवली आहे. भाजी मार्केट इमारतीच्या बांधकाम प्रश्नी ग्लोबल असोसिएट तर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. नगरपंचायत ने जर ग्लोबल असोसिएट च्या विरुद्ध निर्णय घेतला तर तो निर्णय ग्लोबल असोसिएटला कळविल्यापासून चार आठवडे त्याची अंमलबजावणी करू नये असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!