*कोंकण एक्सप्रेस*
*तिरंगा यात्रेतून राष्ट्रभक्तीचा विराट हुंकार*
*तिरंगा हातात… राष्ट्राभिमान मनात… आणि भारतमातेचा जयघोष ओठांवर*
*कुडाळ : प्रतिनिधि*
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दि. १० ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात येत आहे. याच राष्ट्रभक्तीच्या उत्सवाला जनसहभागाची भक्कम जोड देत राष्ट्रप्रेमी नागरिक मंच, कुडाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य ‘तिरंगा यात्रा ‘कुडाळ येथे संपन्न झाली
कुडाळ-मालवण मतदारसंघातील हजारो राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत तिरंग्याप्रती असलेला अभिमान आणि भारतमातेप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली.
भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर, डौलाने शाळेतल्या मुलांच्या हातात फडकणारा तिरंगा आणि प्रत्येकाच्या मनात जागलेली राष्ट्रभक्ती… हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आणि अभिमानास्पद होता! 🔥🇮🇳
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय श्री. निलेशजी नारायणराव राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाचे प्रमुख श्री. विवेक पंडित, संयोजक श्री. संदीप गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा उपजिल्हाप्रमुख बबनजी शिंदे, कुडाळ मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संताेष साटविलकर, यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि कुडाळ-मालवण मतदारसंघातील राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा केवळ तिरंगा यात्रेचा उत्सव नव्हता…
हा होता राष्ट्रभक्तीचा महासागर!
हा होता एकजुटीचा संदेश!
हा होता ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संकल्प!
तिरंगा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा, त्यागाचा आणि अस्मितेचा प्रतीक आहे. या तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रहिताची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागृत राहो, हीच भावना!
तिरंगा उंच राहिला पाहिजे…
भारताचा गौरव अखंड राहिला पाहिजे!
भारत माता की जय!
वंदे मातरम्!
जय हिंद!

