रुग्णवाहिका लोकार्पण हे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील सर्वांत मोठे पाऊल आहे…

रुग्णवाहिका लोकार्पण हे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील सर्वांत मोठे पाऊल आहे…

*कोंकण Express*

*रुग्णवाहिका लोकार्पण हे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील सर्वांत मोठे पाऊल आहे…*

*रविंद्र चव्हाण; भाजपचा सेवाभावी कार्यकर्ता म्हणून विशाल परबांचे कौतुक…

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

विशाल परब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा हा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील सर्वांत मोठे पाऊल आहे. त्याचा फायदा अनेक गरजूंना होईल, असे कौतुक राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले. दरम्यान विशाल परब हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सेवाभावी वृत्तीने सुरू आपले काम असेच सुरू ठेवावे, निश्चितच त्यांना त्याचा भविष्यात फायदा होईल, असे ते म्हणाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सहा रुग्णवाहिका वाटप करण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण श्री. चव्हाण आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी श्री. परब यांना शुभेच्छा देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, अॅड. अनिल निरवडेकर, गोव्याचे माजी आमदार जीत आरोलकर, विशाल परब, सौ. वेदिका परब, मनोज नाईक, रवी मडगावकर, दिलीप भालेकर, सुधीर आडिवरेकर, लवू भिंगारे, केतन आजगावकर, दिपाली भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. चव्हाण पुढे म्हणाले, या ठिकाणी समाजाप्रती सेवाभावी वृत्ती ठेवून विशाल परब यांनी घेतलेला रुग्णवाहिका लोकार्पणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यांच्या संकल्पनेमुळे त्याचा मतदारसंघातील गरजू लोकांना फायदा होणार आहे. अत्यावश्यक प्रसंगी तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निश्चितच असे लोकाभिमुख उपक्रम राबवणे गरजेचे आहे. लोकांची सेवा सेवा करून समाजकारणातून त्यांनी आपली पुढे वाटचाल सुरू ठेवावी.

ते पुढे म्हणाले, मी पालकमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला चालना दिली. टेली मेडिसिनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. जेनेरीक औषधांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला. सर्वसामान्य तळागाळातील लोकांना आरोग्य सुविधा कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले. अशाच प्रकारे सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून विशाल परबांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी ती काम करावे, त्यांच्या पाठीशी आमचे आशीर्वाद कायम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!