*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला आदर्श पुरस्कार प्रदान…*
*नाना पटोलेंच्या हस्ते वितरण; पालघर येथील कार्यक्रमात सन्मान….*
*पालघर ता.०९:*
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पत्रकारांनी येणाऱ्या आव्हानांचा सामना करत सत्याची बाजू उचलून धरावी,आणि आपल्या लिखाणात सातत्य ठेवावे,असे आवाहन श्री.पटोले यांनी केले.
पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे हा मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार विरतण सोहळा पार पडला.यावेळी मुबंईच्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने २०२० वर्षासाठी जाहीर झालेला रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण झाले.
याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम. देशमुख,माध्यम तज्ज्ञ समिरण वाळवेकर आदी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.तर बोर्डी पालघर येथे मराठी पत्रकार परिषदेच्या रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला प्रदान करताना माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,खासदार राजेंद्र कुमार गावित,आमदार श्रीनिवास वंनगा,,सोबत परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,सचिव उमेश तोरस्कर, उपाध्यक्ष रमेश जोगळे,उज्वल नारकर,सदस्य हरिश्चंद्र पवार,बंटी केनवडेकर,बाळ खडपकर,सुहास देसाई आनंद लोके,नरेंद्र देशपांडे, समीर म्हाडगुत मंगेश तावडे आदी उपस्थित होते.